महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर हवाई वाहतुकीच्या सुरक्षा संदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित होतात. देशभरात ४९७ विमानतळे आहेत. पण ती सर्वच सुरक्षित आहेत. किंबहुना ती तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत, असे म्हणता येत नाही. महाराष्ट्राची अवस्था देखील यापेक्षा वेगळी नाही. महाराष्ट्रामध्ये एकूण एकतीस विमानतळांचा पसारा तयार झालेला आहे. मात्र यापैकी किती विमानतळ नियमित चालतात आणि ती तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आहेत याविषयी प्रश्नचिन्हच आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर हवाई वाहतुकीच्या सुरक्षा संदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित होतात. देशभरात ४९७ विमानतळे आहेत. पण ती सर्वच सुरक्षित आहेत. किंबहुना ती तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत, असे म्हणता येत नाही. महाराष्ट्राची अवस्था देखील यापेक्षा वेगळी नाही. महाराष्ट्रामध्ये एकूण एकतीस विमानतळांचा पसारा तयार झालेला आहे. मात्र यापैकी किती विमानतळ नियमित चालतात आणि ती तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आहेत याविषयी प्रश्नचिन्हच आहे.

बारामती येथील विमानतळ हे केवळ नावालाच आहे. ती खरी तर छोटी धावपट्टीच आहे. या विमानतळावर दररोज विमाने ये जा करीत नाहीत. या विमानतळाचा वापर वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी केला जातो, अशी नोंद तरी आता आहे. अशाच प्रकारची अनेक विमानतळे महाराष्ट्रात पडून आहेत. केवळ राजकीय प्रतिष्ठेसाठी अनेक नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये विमानतळांची उभारणी करण्याचा आग्रह धरला म्हणून मुहूर्त केलेला आहे. त्या विमानतळावर सर्व प्रकारच्या तांत्रिक सुविधा नाहीत. अनेक विमानतळावर थोड्याशा खराब हवामानामुळे किंवा रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची किंवा उड्डाण करण्याची सोय नाही. बारामती येथील अपघाताविषयी जी पहिली माहिती समोर आली. ती धुके असल्यामुळे विमान उतरण्यास अडथळा निर्माण झाला, असे म्हटले जात आहे. याची तांत्रिक चौकशी अद्याप पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे हेच कारण असेल असे देखील नाही. पण या विमानतळावर नियंत्रण कक्ष नसल्यामुळे विमानाचे लँडिंग रामभरोसेच होते. हे निश्चित..! हे विमानतळ १९९६ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रायोजित करून बांधले. पण गेल्या तीस वर्षात या विमानतळाचा पूर्ण विकास होऊ शकलेला नाही. ही महाराष्ट्रातील हवाई वाहतुकीची अवस्था आहे. सध्या या विमानतळाचे व्यवस्थापन रिलायन्स कंपनीकडून पाहिले जाते.

अजित पवार. छाया: इंडियन एक्सप्रेस

पुणे जिल्ह्यात बारामती हे जिल्हा स्थानापासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे. तो परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेला आहे. शिवाय शैक्षणिक हब आहे. शेजारी सातारा जिल्ह्याचा फलटण भाग आणि पूर्वेला इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस वगैरे संपन्न भाग आहे. या भागासाठी बारामती जिल्हा स्थान करून विमानतळ परिपूर्ण करण्याची गरज आहे. त्या परिसरातून खूप मोठ्या प्रमाणात लोक हवाई वाहतुकीचा उपयोग करतात. किंबहुना त्यांना पुणे विमानतळाशिवाय पर्याय नसल्याने बारामतीचा विमानतळ विकसित करण्याची गरज केव्हाच निर्माण झाली आहे. तीस वर्षापूर्वी जे विमानतळ तयार करण्यात आले आहे. ते परिपूर्ण होऊ नये हे खरंतर अक्षम्य दुर्लक्ष आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

महाराष्ट्रमध्ये एकूण जी आता एकतीस विमानतळे आहेत त्यापैकी मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि शिर्डी ही सहा विमानतळे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता प्राप्त आहेत. शिवाय देशांतर्गत वाहतूक देखील इथून होते. चार विमानतळे ही हेअर स्ट्रिप सारखी आहेत. त्यामध्ये पुण्यातील हडपसर, धुळे, कराड आणि बारामतीचा समावेश होतो. येथून दैनंदिन हवाई वाहतूक होत नाही या धावपट्ट्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरल्या जातात. महाराष्ट्रात लष्कराच्या ताब्यात असलेली चार विमानतळ आहेत. त्यामध्ये नाशिकचे विजयनगर आणि गांधीनगरचे विमानतळ, कल्याणचे बंद असलेले विमानतळ आणि रत्नागिरीचे विमानतळ हे नौदलाच्या ताब्यात आहे. या विमानतळावरून प्रवासी वाहतूक करता येते. नाशिकला तसे पाहिले तर तीन विमानतळ आहेत. पुणे जिल्ह्यातील ॲम्बी व्हॅली – लवासा आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे खासगी विमानतळे आहेत. या दोन्ही विमानतळावर दररोज वाहतूक होत नाही. लवासामध्ये राहणारे उच्चभ्रू लोक खाजगी विमानाने ॲम्बी व्हॅलीत येतात. शिरपूरला तशी ती केवळ धावपट्टीच आहे.

याशिवाय पंधरा विमानतळे असलेला एक वर्ग आहे. त्यामध्ये मुंबईतील जुहू, विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया यांचा समावेश होतो. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, धाराशिव आणि जळगांव, सिंधुदुर्ग, सोलापूर फलटण आणि कोल्हापूरचा समावेश आहे. ही सर्व पंधरा विमानतळे देशांतर्गत प्रवासी वाहतूक करण्यासाठी करण्यात आले तयार करण्यात आलेली आहेत. मात्र यापैकी जुहू, यवतमाळ, लातूर, अकोला, चंद्रपूर, धाराशिव, गोंदिया सिंधुदुर्ग विमानतळावरून नियमित प्रवासी वाहतूक होत नाही. ही केवळ ऊन वारा पाऊस खात पडून राहिलेले आहेत. लातूर आणि धाराशिव ही दोन्ही शहरे पूर्वी एकाच जिल्ह्यात होती. धाराशिवमधून लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तसे पाहिले तर या दोन्ही ठिकाणची विमानतळे एकाच जिल्ह्यात असल्यासारखे आहेत. शिवाय धाराशिव जवळ सोलापूरला विमानतळ आहे आणि लातूरपासून जवळ नांदेडला विमानतळ आहे. तरी देखील या दोन्ही ठिकाणच्या राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी विमानतळे तयार करण्यात आलेली आहेत मात्र त्यांचा वापर होत नाही.

महाराष्ट्रातील विमानतळे

आंतरराष्ट्रीय विमानतळ
१) मुंबई २)नवी मुंबई ३)नागपूर ४)नाशिक ५)पुणे ६)शिर्डी
(या विमानतळावर देशांतर्गत प्रवासी वाहतूक देखील होते)

देशांतर्गत विमानतळे
१) जुहू -मुंबई २)कोल्हापूर ३)फलटण ४)सोलापूर ५)सिंधुदुर्ग ६)छत्रपती संभाजीनगर ७)नांदेड ८)लातूर ९)धाराशिव १०)यवतमाळ ११)अमरावती १२)अकोला १३)चंद्रपूर १४) गोंदिया १५) जळगाव

लष्कराची विमानतळे
१)विजयनगर नाशिक २)गांधीनगर नाशिक ३)कल्याण ४)रत्नागिरी

फ्लाईंग स्कूल
१)हडपसर- पुणे २)धुळे ३)कराड ४)बारामती

खासगी विमानतळे
१) ॲम्बी व्हॅली- पुणे २)शिरपूर -धुळे
नियोजित विमानतळ

१) नवे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ छाया: ए साविन/विकी

छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जळगाव, नांदेड, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि कोल्हापूर येथून दररोज विमान वाहतूक चालू झाली आहे. सोलापूरहून अजूनही रात्रीच्या वेळी विमान उड्डाण करता येत नाहीत. ते परिपूर्ण झालेले नाही. मुंबई आणि गोव्याला दररोज एक विमान जाते पण हवामान खराब असेल तर विमान उड्डाण करण्यास किंवा लँडिंग करण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. कोल्हापूरचे विमानतळ गेल्या काही वर्षात परिपूर्ण करण्यात आलेले आहे. पूर्वी या ठिकाणी नाईट लँडिंगची सोय होती. पण २००८ मध्ये नांदेडला गुरुत्वा गद्दी उत्सव होता.तेव्हा ती यंत्रणा नांदेडला हलवण्यात आली.

राज्यातील देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी असलेल्या एकवीस विमानतळापैकी फलटणचे विमानतळ ही केवळ धावपट्टीच होती आणि ती आता बंद ही करण्यात आलेली आहे. ही सर्व विमानतळे सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. काही विमानतळ हे रिलायन्स कंपनीकडे देण्यात आलेले आहेत.त्यामध्ये बारामतीच्या विमानतळाचा देखील समावेश आहे. काही विमानतळ ही महाराष्ट्र विमान विकास कंपनीकडे आहेत. काही विमानतळे ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या ताब्यात आहेत. मुंबई आणि नवी मुंबईतील विमानतळांचा ताबा हा अदानी उद्योग समूहाकडे देण्यात आलेला आहे. नाशिकचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे आहे. पुण्याचे विमानतळ हे आंतरराष्ट्रीय असले तरी त्याचा ताबा भारतीय हवाई दलाकडे आहे. मुळात पुण्यात प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र विमानतळ बांधण्यात आलेले नाही. हवाई दलाच्या विमानतळच विस्तारित करून प्रवासी वाहतुकीसाठी वापरला जातो. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे ते महाराष्ट्रातील बत्तीसावे विमानतळ असेल आणि सातवे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे.

बारामती विमानतळासारखी महाराष्ट्रात सुमारे एकवीस विमानतळे आहेत. म्हणजे फक्त धावपट्ट्या आहेत. तेथे कोणतीही आधुनिक यंत्रणा नाही. असेच बारामतीचे विमानतळ आहे.

या सहा विमानतळांसह कोल्हापूर, नाशिक, नांदेड या तीनच विमानतळावर पूर्ण यंत्रणा आहे. रात्रीदेखील या विमानतळांवर विमाने उतरविता येतात. त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. दररोज विमानांची ये जा होते. याचाच अर्थ बत्तीस पैकी नऊ विमानतळे खात्रीपूर्वक वापरता येतात. एखाद्या विमानतळाची उभारणी ही सोपी गोष्ट नाही. केवळ राजकीय प्रतिष्ठेसाठी धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, धुळे, अकोला, बारामती, हडपसर, सोलापूर, अमरावती, जळगाव, कराड आदी ठिकाणी आहेत. यातील काही खाजगी आहेत.

सांगलीची मागणी
महाराष्ट्रातील इतक्या संख्येने विमानतळे असताना नव्या विमानतळांची मागणी होते आहे. जी काही अर्धवट अवस्थेत विमानतळे आहेत. ती सर्व आधुनिक यंत्रणेसह चालवता येऊ शकतात. ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली पाहिजेत. असे असताना सांगलीलाही विमानतळ झाले पाहिजे. अशी मागणी अनेक वेळा केली जाते. सांगलीपासून कोल्हापूर केवळ पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूर पासून उस्मानाबाद केवळ पन्नास किलोमीटरवर आहे. हे अंतर आता चांगले झालेल्या रस्त्यामुळे केवळ तीस मिनिटात पूर्ण करता येते. लातूर पासून नांदेड जवळ आहे. त्यामुळे तिथे विमानतळाची गरज नाही. विभागवार पाहणी करून दोन-तीन जिल्हे क्लब करून अद्यावत विमानतळांची निर्मिती केली पाहिजे. सांगली कोल्हापूरवर अवलंबून असेल, सातारा पुण्यावर अवलंबून असेल, सोलापूरवर उस्मानाबाद अवलंबून असेल. बीड आणि जालना संभाजीनगरवर अवलंबून असतील. हिंगोली, परभणी, लातूर हे जिल्हे नांदेड विमानतळावर अवलंबून असतील.

अमरावतीवर पश्चिम विदर्भातली जिल्हे अवलंबून असतील. पूर्व विदर्भात नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हवे तर चंद्रपूरला विमानतळ विकसित करता येऊ शकतो. नाशिकला परिपूर्ण विमानतळ करण्यात आलेला आहे. शिवाय या परिसरासाठी शिर्डीचा आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ पंधरा वर्षात विकसित झाला आहे. देशांतर्गत प्रवासासाठी शिर्डीला वापर खान्देशातील मोठ्या विभागाला करता येतो.

मुंबईच्या विमानतळावर काही प्रश्न निर्माण झाल्यास नाशिकचा वापर करता येऊ शकतो. मुंबईत विमाने उतरवण्याचा प्रश्न निर्माण झाला तर अहमदाबाद, पुणे किंवा गोव्याला ती वळवली जातात. नांदेडमधून देशभरात विमान वाहतूक चालू शकते. खानदेशातला इतर भाग दूर असल्यामुळे जळगावचे विमानतळ विकसित करता येते.

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे विमानतळ परिपूर्ण केलेला आहे. रत्नागिरीचा देखील वापर करता येऊ शकतो. गोव्याचा मनोहर परिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सीमेवरच आहे.

महाराष्ट्राच्या विमान वाहतुकीचा रोड मॅप तयार केला पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने ही तीन जिल्ह्यासाठी विमानतळे परिपूर्ण विकसित केली पाहिजेत. बारामतीच्या विमानतळास तीस वर्षे होऊनही ते तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असल्याने आपल्याला आज अजित दादांच्या रूपाने किती मोठी किंमत मोजावी लागली. हे ताजे उदाहरण आहे.

कोल्हापूरचे विमानतळ लवकर परिपूर्ण करा, अशी कित्येक वर्षाची मागणी होती. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आत्ता कुठे कोल्हापूरचे विमानतळ परिपूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी रात्रीचे लँडिंग होऊ शकत नाही. राजकीय नेतृत्वाने केलेल्या दुर्लक्षामुळे ही सर्व अवस्था निर्माण झालेली आहे. कराडचे विमानतळ देखील परिपूर्ण नाही. कराडपासून कोल्हापूर केवळ साठ मिनिटांच्या अंतरावर आहे आणि राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले आहे. त्यामुळे कराड ऐवजी कोल्हापूरचे विमानतळ सोयीचे ठरू शकते. कराडसह धाराशिव, लातूर, जालना, अकोला, धुळे, गोंदिया, आदींचा विस्तार करण्याचा फेरविचार करावा. आधुनिक दळणवळणाची साधने आवश्यक आहेत. याचा विचार करता महाराष्ट्राने हवाई वाहतुकीचा मॅप तयार करावा आणि टप्प्याटप्प्याने तो पूर्ण करावा ज्या विमानतळावर पुरेशी यंत्रणा नाही अशी विमानतळे वापरण्यास परवानगी देऊ नये.

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांनी किमान महाराष्ट्राच्या हवाई तळांच्या विकासाचा तीन टप्प्यांमध्ये विस्तार करावा. रत्नागिरी, सोलापूर, चंद्रपूर, अमरावती, जळगाव येथील तरी विमानतळे पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने चालू करावीत. काही चालू आहेत. उर्वरित विमानतळांचा विचार करून गरजेनुसार टप्प्याटप्प्याने ते परिपूर्ण करायला पाहिजेत. बारामती हा जिल्हा करून तेथील विमानतळ परिपूर्ण झाले पाहिजे. तो सर्व परिसर औद्योगिक दृष्ट्या विकसित आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांचा जिल्ह्यांची विभाजन करून जिल्ह्यांचे विभाजन करून नवे जिल्हे स्थापन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किमान दीडशे किलोमीटरवर विमानतळ असेल असे नियोजन करून त्यातून टप्प्याटप्प्याने हे विमान विमानतळे पूर्ण केली पाहिजे यासंबंधी स्पष्ट नियोजन नसल्यामुळे अनेक वर्ष अनेक विमानतळ विकसित नव्हता पडून राहिलेली आहेत.

मुंबईतील डोमेस्टिक एअरपोर्ट वरील ताण कमी झाला असेल. कारण नवी मुंबईला विमानतळ सुरू झालेले आहे. डोमेस्टिक एअरपोर्टशी महाराष्ट्रातील या विमानतळांना जोडले पाहिजे. अनेक जिल्ह्यांमध्ये विमाने ये जा करतात. त्यांच्या वेळा गैरसोयीच्या आहेत. याचा देखील एकदा विचार केला पाहिजे. वेळा गैरसोयीच्या असल्यामुळेच प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

यावर आपले मत नोंदवा

अभिलेख (Archives)