जागर

“जागर” हा एक नावापेक्षा जास्त आहे—हे एक क्रियेचा आवाहन आहे. जागराचा अर्थ—उठणे, जागरण—हे लक्षात आणते की जागरूकता ही समजण्याची आधारभूत आहे, आणि समजणे हे परिवर्तनाचे उत्प्रेरक आहे.

“जागर” म्हणजे वृत्तपत्र पत्रकारितेत सडेतोड लिखाण करणारे आणि समाजमन सजग, जागृत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले संपादक, वसंत भोसले, यांचे प्रेरणादायक लेख!

Logo of Jagar, a hand with a pencil writing the name jagar in marathi, with the name of the author Vasant Bhosale

An image of the author Vasant Bhosale writing at his desk

वसंत भोसले

श्री वसंत भोसले यांनी वृत्तपत्रिय पत्रकारितेमध्ये सलग चाळीस वर्षे काम केले आहे. त्यांच्या अभ्यासाचे विषय राजकीय घडामोडी, ग्रामीण विकास, शेती आणि विकासाचे प्रश्न आदि आहेत. शिवाय महाराष्ट्राची वाटचाल हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे. सातत्याने त्यांनी या विषयावर लिखाण केले आहे. पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

दैनिक केसरीमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. दैनिक पुढारीमध्ये देखील काही काळ वृत्तसंपादक म्हणून काम केले. सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक म्हणून चार वर्षे काम पाहिले आणि लोकमतला संपादक म्हणून तेरा वर्षे ते कार्यरत होते. विविध राज्यातील निवडणुकीचे वार्तांकन करण्याचाही त्यांचा मोठा अनुभव आहे. तसेच या निवडणुकांचे अंदाजही अचूक वर्तविले आहेत. जागर हे सदर लोकमतचे संपादक असताना सलग दहा वर्षे लिहीत होते. निवृत्तीनंतर आता त्यांनी जागर ऑनलाईन डॉट कॉमवर लिखाण सुरू केले आहे.


संपर्क (Contact)

Email: bhosalevasant[at]gmail.com