ऑलिंपिक स्पर्धे खालोखाल आशियाई क्रीडा स्पर्धा ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. तिचा जन्मच भारतात झाला तेव्हाचा गरीब भारत केवळ चार वर्षांचा होता. पहिली स्पर्धा नवी दिल्ली येथे १९५१ मध्ये झाली. आजवर नऊ देशांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. एकूण ४५ देश या स्पर्धेत भाग घेतात.
बहुविध क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली आशियाई क्रीडा स्पर्धा ही ऑलिंपिक नंतरची जगातली दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा आहे. आशिया खंडातील ४५ देश या स्पर्धेत भाग घेतात. या स्पर्धेचा प्रारंभ स्वतंत्र भारतात झाला. तेव्हाचा भारत हा एक नव्याने उदयास आलेला केवळ चार वर्षांचा गरीब भारत होता आणि आज तो भारत समृद्धीकडे वाटचाल करीत असला तरी या स्पर्धा गाजवणारे खेळाडू हे त्याच “गरीब भारता”च्यातून येतात. याचा गौरव, अभिमान मानायचा की कौतुक करायचे, असा प्रश्न पडतो.
आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशा दरम्यान भरवली जाणारी एक बहुविध क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची संलग्न असलेली संस्था करते. ऑलिंपिक स्पर्धे खालोखाल एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे.
सर्वप्रथम आशियाई स्पर्धा आपली राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ झाली. आजवर नऊ देशांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे . एकूण ४६ देश या स्पर्धेत भाग घेतात. परंतु १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलवर बंदी घालण्यात आली. सध्या आशियामधील सर्व ४५ देश या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.
स्पर्धेचे अध्यक्षपद सध्या कुवेतकडे आहे. त्यामुळे मुख्यालय देखील कुवेतमध्येच आहे. शेख जोआन बिन हमद बिन खलीफा अल थानी हे कतारच्या राजघराण्यातील आणि क्रीडा प्रशासक विद्यमान अध्यक्ष आहेत. जपानमध्ये ही स्पर्धा तिसऱ्यांदा होत आहे. यापूर्वी १९५८ आणि १९९४ मध्ये जपानने या स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. जपानमधील आची आणि नागोया या शहरात दिनांक १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही बाविसावी स्पर्धा होत आहे. ४५ देशांतील खेळाडू यंदाच्या स्पर्धेत ४३ खेळांमधील ४६९ पदकांसाठी खेळत होते.
मानाची स्पर्धा
भारत या स्पर्धेत पाचव्या स्थानावर (शनिवार अखेर) होता. संघाने अनेक सुवर्णपदकांसह दमदार कामगिरी केली आहे. भारताचे ४९५ खेळाडू ३६ वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी झाले आहेत. काही अपवाद वगळता दर चार वर्षांनी ही स्पर्धा आशिया खंडात होत आली आहे. या स्पर्धेला खूप महत्त्व आहे. ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेच्या अगोदरची पायरी ही स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेतील भारताची कामगिरी ही महत्त्वाची मानली जाते.
चार वर्षांपूर्वी चीनमध्ये जेव्हा एकविसावी स्पर्धा पार पडली तेव्हा शंभरहून अधिक पदके जिंकून भारताने आजवरची उत्कृष्ट कामगिरी केली होती. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत थोडी पीछेहाट झाली असली तरी ज्या स्पर्धकांनी यश मिळवलेले आहे. त्यांच्या वाटचालीकडे, त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीकडे एक नजर टाकली तर असे दिसते की, गरीब वर्गातील तरुण-तरुणीच क्रीडा क्षेत्रामध्ये उतरतात. आणि देशाचे नाव उज्वल करतात. ज्यांच्याकडे अशा स्पर्धेची तयारी करण्याची आर्थिक क्षमता नाही कुटुंबाची कोणती पार्श्वभूमी नाही यातील अनेक खेळाडू हे ग्रामीण भागात राहतात. त्या परिसरामध्ये क्रीडा स्पर्धेची तयारी करण्यासाठीचे वातावरण नाही तरी देखील ही मुल-मुली उभे राहतात.
कोईमतूरची विद्या रामराज हिचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत. केरळची अन्सी सोजन तिचे वडील रिक्षा चालक आहेत. अमेठीचा सलमान खान हा स्वतः ओबर टॅक्सी चालक होता. साताऱ्या जवळच्या करंडी गावचा साहिल जाधव याचे वडील खाजगी नोकरी करीत होते आणि आई शिक्षिका आहे. आसाम मधील गोलाघाट मध्ये जन्मलेली लवलीना बोरगोहेन आदिवासी कुटुंबातून आलेली मुलगी आहे. परविन हुडा ही हरयानासारख्या सरंजामशाही समाजातून चमकणारी बॉक्सिंग खेळाडू आहे.
या सर्वांच्या आयुष्याकडे पाहिले, त्यांची वाटचाल पाहिली, त्यांच्या कुटुंबाचा या खेळाडूंना घडवण्याची धडपड पाहिली तर खरंच क्रीडा क्षेत्रामध्ये देशाचा नावलौकिक करण्यासाठी गरीब वर्गातील लोकांचे मोठे योगदान आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे. शिक्षण आहे. शहरात राहतात. क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. अशी एकाही खेळाडूची पार्श्वभूमी नाही.
चमकणारा वैभव
अलीकडेच क्रिकेट विश्वामध्ये चमकत असलेला वैभव सूर्यवंशी हा देखील बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यात तेजापूर गावचा आहे. त्याचे वडील त्याला वयाच्या आठव्या वर्षापासून क्रिकेटपट्टू बनवण्यासाठी धडपड करीत होते. चांगल्या सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे असे वाटू लागले तेव्हा ते मोटरसायकल वरून तेजापूर in पासून पाटण्यापर्यंत शंभर किलोमीटर प्रवास करीत होते. अशा कष्टातून त्याला त्यांनी उभे केलेले आहे. वैभव सूर्यवंशी याने यावर्षीच्या आयपीएल क्रिकेट हंगामामध्ये धमाका उडवला. केवळ पंधरा वर्षाचा हा मुलगा या स्पर्धेत सर्वाधिक ७२ षटकार ठोकून आणि सर्वाधिक धावा करून विक्रम नोंदवला आहे. त्याला आता यशाच्या शिखरावरून कोणी खाली ओठूच शकत नाही.
अशा काही खेळाडूंची माहिती आपण पाहिल्यानंतर असे वाटते की, ज्या गरीब भारताने पुढाकार घेऊन आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू केली. त्या भारताची समृद्धीकडे वाटचाल चालू असताना ज्यांनी देशाच्या समृद्धीचा लाभ घेतला आणि स्वतः समृद्ध झाले. ते देशाचे नाव क्रीडा क्षेत्रात चमकावे यासाठी कष्ट करायला तयार नाहीत. याउलट भारतातल्या कष्टकरी आणि गरीब सामान्य कुटुंबातील मुलेच जीवाचे रान करतात आणि देशाचे नाव घडवण्याचा प्रयत्न करतात. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये चारशेहून अधिक खेळाडू भाग घेतलेले आहेत.त्या सर्वांची कमीअधिक प्रमाणात अशीची पार्श्वभूमी आहे
खेलो इंडिया
भारत सरकारने “खेलो इंडिया” सारखी चांगली संकल्पना राबवायला सुरू केली आहे. या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप द्यायला हवे. ही संकल्पना म्हणजे जे खेळाडू चमकतात त्यांना अधिक सुविधा निर्माण करून देण्याचे धोरण आहे. पण आपल्या देशातील खेड्यापाड्यांमध्ये दलित, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, आदिवासी अशा अनेक समाज घटकांमध्ये कष्ट उपसण्याची प्रचंड शारीरिक ताकद असणारे तरुण-तरुणी आहेत. अशांचा शोध घ्यायला पाहिजे.
चीन आज आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके मिळवून प्रथम क्रमांकावर आहे. याचे कारण खेळाडू तयार करण्यासाठी चीन लहान मुलांची निवड करते आणि त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देतो. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. साधने उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे त्यांचे अनेक खेळाडू विजयाचे शिखर गाठतात. आपल्या काही खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकून धमाका निर्माण केला आहे. त्यापैकी काही खेळाडूंची उदाहरणं दाखल आढावा घेऊ या. त्यांची वाटचालही पाहू. ते चमकणारे खेळाडू तावून-सुलाखून पुढे आलेले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत आणि ती सर्व कष्टकरी वर्गातील मुले मुली आहेत.
विद्या रामराज
आशियाई क्रीडा स्पर्धेत , तिने ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५४.७५ सेकंदांची वेळ नोंदवून एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आणि १९८४ च्या ऑलिम्पिकमध्ये पी . टी. उषा यांनी प्रस्थापित केलेला विक्रम मोडला. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली आहेत .ती तामिळनाडूतील कोईम्बतूरची आहे. तिचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत. ती तिच्या आई-वडिलांच्या तीन मुलींपैकी एक आहे. विद्याला धावण्यासाठी बूट खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असायचे नाहीत. तेव्हा ते एक वेळचे जेवण टाळून पैसे साठवायचे अशी आठवण ती सांगते आहे.

साहिल जाधव
आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी खेळणाऱ्या आणि दोन सुवर्णपदके जिंकणाऱ्या साताऱ्या जवळच्या करंडी गावचा. घरची परिस्थिती बेताची वडिलांची नोकरी गेलेली होती बहिणीची जबाबदारी होती अशा पार्श्वभूमीवर तिरंदाजी मध्ये यश मिळण्यासाठी तो धडपडत होता खेळाडूची आईला त्याच्या तयारीसाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवते. त्याला खेळाचे साहित्य या कर्जातून ती उभी करते मिळवून देते त्या साहित्याच्या आधारे तो सराव करतो आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एकाच दिवशी दोन सुवर्णपदके मिळवतो. हा खेळ आमच्यासारख्या सामान्य कुटुंबास परवडणारा नव्हता, असे साहिलच्या आई सीमा जाधव सांगतात.

सलमान खान
हा रोइंग खेळाडू (ॲथलीट) आहेतl. आशियाई क्रीडा स्पर्धेत सहकारी सातनाम सिंग यांच्यासोबत पुरुषांच्या ‘डबल स्कल्स’ रोइंग प्रकारात भारतासाठी कांस्य पदक जिंकले. या प्रकारात भारताचे हे पहिलेच पदक आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीचे असणाऱ्या सलमान खान यांनी वयाच्या १८ व्या वर्षी वडिलांचे छत्र गमावले. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याने दिल्लीमध्ये काही काळ ‘उबर’ कॅब/टॅक्सी देखील चालवली. जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्याची परीक्षा उत्तीर्ण केली आणि सैन्यात दाखल झाला. तेथेच त्यांच्यातील शारीरिक क्षमता पाहून प्रशिक्षकांनी त्यांना रोइंग खेळ खेळण्याचा सल्ला दिला.

अँसी सोजन एडप्पिल्ली
ही एक लांब उडीपटू आहे. तिने २०२२ आणि २०२६ च्या आशियाई खेळांमध्ये आणि २०२५ च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदके जिंकली आहेत. केरळमधील त्रिशूर येथील नट्टिका या छोट्या मच्छीमार गावात एका सामान्य सीरियन ख्रिश्चन कुटुंबात झाला. तिचे वडील ऑटो-रिक्षा चालक. तिला तिच्या गावातील समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जात असत, जिथे ती भुसभुशीत वाळूवर उड्या मारण्याचा सराव करत असे. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले. तियानजिन (२०२६) आशियाई इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले. भुवनेश्वर येथे झालेल्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये अंजू बॉबी जॉर्जने प्रस्थापित केलेला ६.८३ मीटरचा २२ वर्षे राष्ट्रीय विक्रम मोडला.

लवलिना बोरगोहेन
आसामच्या गोलाघाटची आदिवासी मुलगी आहे. आशियाई स्पर्धेत महिलांच्या ७५ किलो बॉक्सिंग मध्ये चीनच्या बाओ झिईचा करून सुवर्णपदक पटकावले. आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी दुसरी भारतीय महिला बॉक्सर ठरली. तिचे वडील टिकेन यांचा लघुउद्योग आहे. मुलीच्या क्रीडा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी बरीच आर्थिक कसरत केली. पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक आणि गुवाहाटीमध्ये झालेल्या दुसऱ्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि ६९ किलो वेल्टरवेट श्रेणीत तिने तिसरे स्थान मिळवले. लवलिना ही आसाम राज्यातून ऑलिम्पिसाठी पात्र ठरलेली पहिली महिला आहे.

परवीन हुडा
परवीन हुडा ही बॉक्सर आहे. तिने २०२५ विश्वचषक , २०२६ आशियाई खेळ आणि २०२२ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. ती इंडो -तिबेटियन बॉर्डर पोलिसात सहायक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. हरयानातील रोहतक जिल्ह्यातील रुरकी गावात एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे कुटुंब आर्थिक अडचणी होते. त्यांना बॉक्सिंगचे हातमोजे (ग्लोज) सुद्धा परवडत नव्हते. परवीनचे वडील लखपत सिंग यांना अनेक आरोग्य समस्या होत्या आणि ते जड काम करू शकत नव्हते. २०११ मध्ये जेव्हा तिच्या गावचे तत्कालीन सरपंच सुधीर हुडा यांनी एक बॉक्सिंग अकादमी सुरू केली, तेव्हा त्यांनी तरुणांना खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.

कुमकुम मोहोड
अमरावती शहराच्या गोसावी कॉलनीत राहणारी कुमकुम मोहोड केवळ सतरा वर्षांची मुलगी. तिने तिरंदाजीतील आपले आशियाई स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावले. यावर्षीच्या तिच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय हंगामात शांधाय आणि अंताल्या येथे झालेल्या दोन जागतिक अजिंक्य स्पर्धेत सुवर्णपदके जिंकल्यानंतर कुमकुम हिने आशियाई क्रीडा स्पर्धेतही पहिले वैयक्तिक सुवर्णपदक आणि मिश्र गटात रौप्यपदक जिंकले. वडील घरीच मिठाईची खोकी बनवतात आणि आई गृहिणी आहे. खेलो इंडियाचे अमरावतीत केंद्र सुरू झाल्याने तेथे तिने सराव केला त्यामुळे तिला हे यश मिळाले असे तिचे वडील सांगतात.



प्रतिक्रिया व्यक्त करा